- पिंपरी विधानसभेत केला भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध..
- बिनविरोधमध्ये आ. गोरखे यांच्या नेतृत्वाचे व संघटन कौशल्याचे मोठे योगदान…
अशोक लोखंडे – संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ जानेवारी २०२६) :- पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पक्षाने पहिला मोठा विजय नोंदवला आहे. ओबीसी प्रवर्गातील भाजपच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया चांदगुडे या बिनविरोध निवडून आल्या असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विजयात आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाचे व संघटन कौशल्याचे मोठे योगदान असल्याचे मानले जात आहे. प्रभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामांची हमी आणि पक्षावरील विश्वास या मुद्द्यांवर स्पष्टपणे शिक्कामोर्तब झाल्याचे आमदार अमित गोरखे यांचे म्हणणे आहे.
चांदगुडे यांच्या बिनविरोध विजयानंतर प्रभागातील विकासाला गती मिळणार असून महिलांच्या नेतृत्वाला मिळालेली साथ ही विशेष नोंद घेण्यासारखी आहे. पुढील नगरसेवक पदाचा कार्यकाळ विकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर उपाय यांवर केंद्रित राहील, अशी प्रतिक्रिया चांदगुडे यांनी दिली.












