- आकुर्डी ते बिजलीनगर दरम्यान सिनेस्टाईल थरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२४) :- दुचाकीवरून मित्रासह फिर्यादी हे जात होते. तेव्हा मागून आलेल्या कार चालकाने त्यांच्या दुचाकीच्या हॅन्डेलला धक्का दिला. त्याचा जाब कारमधील तिघा जणांना फिर्यादीने विचारला. तेव्हा त्यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांचा मित्र अनिकेत यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपी क्र ३ हा तेथेच थांबला. आरोपी क्रं १ कार चालक व आरोपी क्रं २ याने फिर्यादीला ‘तूला आज जिवंत सोडत नाही’ असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर कार घातली. त्यामुळे ते कारच्या बॉनेटवर पडले. आरोपींनी तशीच कार भरधाव वेगाने चालवत आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून संभाजी चौक मंगल मेडीकल, बिजलीनगर येथे नेली. आरोपीच्या कारमधील महिलेस उतरण्यासाठी त्यांनी कार थांबविली. तेव्हा कारच्या बॉनेटवरून फिर्यादी हे खाली उतरले. तेवढ्यात आरोपी हे गाडीसह पळून गेले, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०१) रोजी रात्री ९.४० वा. सुमारास केटीएम शोरूम जवळ, आकुर्डी ते बिजलीनगर, चिंचवड येथे घडला. जेकेरीया जेकब मैथ्यू (वय २३ वर्षे रा. भक्ती शक्ती चौक, निगडी) यांनी आरोपी १) पांढ-या रंगाचे कार क्रमांक एम एच १४ एफ जी ३६१५ वरील चालक कमलेश उर्फ अशोक पाटील वय २३ रा बिजलीनगर चिचवड, २) हेमंत चंद्रकांत म्हाळसकर उर्फ सोन्या चंद्रकांत म्हाळसकर वय २६ रा म्हाळसकरवाडी तळेगाव दाभाडे, ३) प्रथमेश पुष्कल दराडे (वय २२ वर्षे रा. वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी ५६३/२०२४ भा.न्या.सं. कलम १०९,११५ (२), ३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोउपनि शिर्के पुढील तपास करीत आहेत.












