न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२४) :- देवेंद्र फडणवीस यांची भाजपा महाराष्ट्र “विधिमंडळ गटनेतेपदी” निवड झाल्याबद्दल आ. अमित गोरखे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानपरिषद आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप उपस्थित होते.
देवेंद्रजी यांच्या दूरदृष्टीने आणि निर्णयक्षमतेने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांची कार्यतत्परता, प्रामाणिकता आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेले काम आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समृद्धीच्या आणि विकासाच्या नव्या उंचीवर जाईल. तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा मला विश्वास असल्याचे अमित गोरखे म्हणाले.












