न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२४) :- श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा ४०० वा जयंती सोहळा रविवार (दि. ८) रोजी श्री संत जन्मभूमी, चाकण ता. खेड, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी सात ते नऊ श्रींची मूर्ती पूजन व अभिषेक, ९. ३० ते १२ वाजता श्रींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा, सकाळी ११. ३० ते १२. ३० पर्यंत शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्वरांचा कार्यगौरव कार्यक्रम होईल. दुपारी १ ते ३.३० पर्यंत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखी सोहळयाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. श्री. गणेश महाराज ओझरकर यांची कीर्तनसेवा होईल.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय ज्ञानेश्वर जाधव (शिवसेना पुणे जिल्हा संघटक), चंद्रकांत भोसले साहेब (मुख्याधिकारी, चाकण न.प.), शिवदास उबाळे (अध्यक्ष, संताजी महाराज जगनाडे संस्था) आदि उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वागत अनिल जगनाडे, सुभाष शिंदे, विजय शंकरराव रत्नपारखी करणार असून, या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











