स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचं आयोजकांच आवाहन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२४) :- पिंपळे सौदागरस्थित बांधकाम विश्वातील अग्रणी नाव ‘यशदा रिअल्टी ग्रुप’ आणि ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशदा पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन’ (PCHM) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार (दि. १५) रोजी पिंपळे सौदागर येथे पार पडणार आहे. सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत २१, १० आणि ५ किमी अंतराच्या शर्यतींचा समावेश आहे. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकाने आयोजकांनी उपलब्ध करून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या नावाची सशुल्क नाव नोंदणी करायाची आहे. यशदाच्या ग्राहकांना शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकाला आकर्षक रोख बक्षीस देण्यात येणार आहेत.
याशिवाय यात टी-शर्ट, फिनिशर्स मेडल, टायमिंग ई-सर्टिफिकेट, झुंबा वॉर्म अप आणि कूल डाउन, हायड्रेशन, रूट सपोर्ट, मेडिकल सपोर्ट, रननंतरचा स्वादिष्ट नाश्ता, विजेत्यांसाठी ट्रॉफी, मोफत धावण्याचे फोटो, गुडी बॅग आदी बाबींचा समावेश आहे.
यशदाच्या वतीने स्वच्छ, सुंदर पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. ‘यशदा पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा म्हणजे धावपटूंना धावण्याचा आनंद देणारा उपक्रम आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी pimprichinchwad_halfmarathon या ‘इंस्टाग्राम’ला ‘फोलो’ करा.