- महापालिकेचा ‘सुधारित सेवा प्रवेश नियम’ संकेतस्थळावर उपलब्ध करा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा प्रवेश नियम पाहण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक ह्क्क संवर्ग परिषद पिंपरी चिंचवड या संघटनेच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सेवा प्रवेश नियम (२०२०) शासनामार्फत मंजूर झालेला आहे. त्याची अमंलबजावणी १८/०२/२०२० पासून महापालिकेमध्ये करण्यात येत आहे. परंतु या सेवा प्रवेश नियमामध्ये अनेक त्रुटी असल्याचे कर्मचारी संघटना व कर्मचा-यांच्या निदर्शनास आले आहे.
सामान्य प्रशासना विभागामार्फत पुनश्च दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या आहेत.
त्या केलेल्या दुरुस्त्या सर्व संवर्गातील कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यामध्ये संभ्रम आहे. सुधारित सेवा प्रवेश नियम शासनास अंतिम मंजूरीस पाठविण्याअगोदर महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करुन त्यावर हरकती मागाव्यात. त्यानंतरच सेवा प्रवेश नियम अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात यावा. त्यामुळे भविष्यात कर्मचारी वर्गाच्या तक्रारी राहणार नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे.












1 Comments
Malia Panarella
Whats Taking place i’m new to this, I stumbled upon this I have discovered It positively helpful and it has helped me out loads. I’m hoping to contribute & aid other customers like its helped me. Good job.