- आरोग्य सहायक आयुक्तांच अधिकाऱ्यांना फर्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२४) :- शहरातील विविध स्मशानभूमी येथे देखभाल व सुरक्षेचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू करुन घेण्याचे न्यायालयाने पालिकेला आदेश दिले आहेत. तरीही ठेकेदाराने १७. कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यास नकार दिला होता. मनसेचे सचिव रुपेश पटेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागाने त्वरीत आदेश काढून त्या सतरा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत विविध स्मशानभूमीची देखभाल आणि सुरक्षेचे काम काही कंत्राटदार संस्थांना देण्यात आले आहे. काही कारणास्तव तेथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थांनी कामावरुन अचानक कमी केले. कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. सर्व कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तरी देखील संबंधित ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्यास विरोध केला जातो. अनेकवेळा दाद मागूनही न्याय मिळत नसल्यामुळे कार्मचाऱ्यांनी मनसेकडे दाद मागितली.
मनसेचे सचिव रुपेश पटेकर यांनी त्या कर्मचाऱ्यांसह आरोग्य सहायक आयुक्तांच्या विभागात जाऊन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावर सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी त्वरीत आदेश काढत संबंधित १७ कर्मचाऱ्यांना कामावर तत्काळ रुजू करुन घेण्यात यावे, अशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीदेखील त्यांनी दिली.












1 Comments
Candelaria Dandrow
Hello.This article was extremely fascinating, particularly since I was searching for thoughts on this matter last Friday.