न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जमिनीत पुरून ठेवलेले दीड लाख रुपये किंमतीचे दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले. पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन जमिनीमध्ये पुरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी मरकळ येथील कंजारभट वस्ती येथे धाड टाकली. या धाडीत तीन हजार लिटर दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नष्ट केला असून आरोपी महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.













1 Comments
tlovertonet
Thank you for any other excellent article. The place else may just anybody get that type of info in such a perfect method of writing? I’ve a presentation subsequent week, and I’m on the search for such information.