न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२४) :- घोरावडेश्वर डोंगरावर निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने गेल्या पंधरा वर्षत हजारो वृक्षांची लागवड केली आहे. वर्षभर नियमितपणे संगोपन केल्याने आता काही झाडे वीस फुटांपर्यंत वाढली आहेत. या झाडांना फुलं, फळ यायला लागली असून लहान मोठ्या पशु पक्षांचा वावर वाढला आहे.
३१ डिसेंबरला वर्षाअखेरीच्या निमित्ताने अनेकजण रस्त्याच्या कडेने, दारुपार्टी करतात. आग पेटवतात यामुळे वणवे लागतात हे टाळण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त संख्येने निसर्ग मित्र व वनविभागाकडील कर्मचारी गस्त घालतात. वनविभागाच्या जागेत कोणी पार्टी करताना आढळले. मादक व ज्वलनशील वस्तू घेऊन विनापरवाना प्रवेश केल्याचा कारणांवरून गुन्हे दाखल करुन अटक केली जाते.
३१ डिसेंबर रोजी तसेच यापुढे कधीही रस्त्याच्या कडेने, जंगलात, झाडांच्या आडोशाला पार्टी करु नये. अशा स्वरुपाची पार्टी करणे हा कायद्याने गुन्हा असून कोणी आढळून आल्यास संबंधित विभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यासाठी घोरावडेश्वर परिसरात ३१ डिसेंबर रोजी निसर्ग मित्र व वनपाल गस्त घालणार असल्याची माहिती निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी दिली.













2 Comments
tlover tonet
Woah! I’m really loving the template/theme of this blog. It’s simple, yet effective. A lot of times it’s difficult to get that “perfect balance” between usability and visual appearance. I must say that you’ve done a amazing job with this. In addition, the blog loads super fast for me on Chrome. Outstanding Blog!
Free Soccer Streaming
I carry on listening to the news update talk about receiving boundless online grant applications so I have been looking around for the best site to get one. Could you advise me please, where could i find some?