न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. ०८ जानेवारी २०२५) :- अॅक्टिव्ह गाडीवरून तळवडे बाजुकडून महाळुंगेकडे जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरचालकाने अॅक्टिवाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात अॅक्टिव्हा गाडीला धक्का बसला. त्या धक्क्यामुळे गाडी रस्त्यावर पडली. त्यामध्ये फिर्यादीचा मयत मित्र सुजित (वय ४२ वर्ष) यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेले.
डोक्याला हेल्मेट परिधान केलेले असताना देखील डंपरचे चाक त्या हेल्मेट वरून गेल्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच गाडीचेहे नुकसान झाले आहे. डंपर चालकाने हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडलेला आहे. हा प्रकार (दि. ७) रोजी मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास निघोजे, महिंद्रा कंपनी समोर घडला.
याप्रकरणी विश्वदीप शिंदे यांनी डंपर गाडी नंबर एमएच 14 बी जे ००१८ वरील चालकाच्या विरोधात फिर्याद दिली असून महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी डंपरचालक अटकेत नाही.













