- पिंपरी येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
- कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी अरुण चाबुकस्वार सर यांच्या हस्ते..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२५) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत विद्यार्थ्यांना संबोधित करत शिक्षण, शिस्त, आत्मविश्वास आणि उद्दिष्ट निश्चित करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सरांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणी जोपासण्याचे, कष्टाचे मूल्य जाणण्याचे आणि समाजासाठी योगदान देण्याचे विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
शाळेच्या शिक्षिका डिंपल काळे, निशा पवार व मनोरमा पाल यांनी विचार मांडले, “विद्यार्थी हा केवळ पुस्तकांचा अभ्यास करणारा घटक नसून, तो प्रश्न विचारणारा आणि विचारप्रक्रिया सुरू करणारा व्यक्ती असतो. प्रश्न विचारणे म्हणजे ज्ञान आणि प्रगतीची पहिली पायरी. त्यामुळे विद्यार्थी दिन हा जिज्ञासा, संशोधन आणि विचारप्रवृत्ती वाढविण्याचा दिवस आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन वंदे मातरम’ हे गीत मोठ्या अभिमानाने गायले. यंदा या गीताच्या १५० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा असल्याने हा क्षण विशेष महत्त्वाचा ठरला.हा दिवस विद्यार्थ्यांसाठी केवळ आनंदाचा नव्हे, तर प्रेरणादायी ठरला — शिक्षण, संस्कार आणि देशभक्तीचे मूल्य अधोरेखित करणारा हा संस्मरणीय सोहळा सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री महाले व आभार समृध्दी वाघमारे यांनी केले.













