- इंद्रायणीनगरमध्ये शारीरिक क्षमता व मैदानी चाचणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर पदासाठी भरती होत आहे.
त्यासाठी २२ ते २४ जानेवारी २०२५ कालावधीत, इंद्रायणीनगर भोसरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल येथील मैदानावर शारीरिक क्षमता व मैदानी चाचणी होणार आहे.
या मैदानाची पाहणी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली. यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, किशोर ननवरे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.











