न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- अन्न धान्य पुरवठा व वितरण कार्यायालयामार्फत शिधापत्रिकाधारकांना डाळीचे वाटप करण्यात येत आहे. निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयाच्या वतीने तूरडाळ व हरभरा डाळीचे वाटप सुरू केले आहे. अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हे वाटप सुरू करण्यात आली असल्याची माहिती परिमंडल अधिका-यांनी दिली.
शिधापत्रिकेवर डाळ, गहू, तांदुळ आदींचे वाटप केले जाते. निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयांतर्गत अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तूरडाळ व चनाडाळीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. एका शिधापत्रिकेवर प्रत्येकी एक किलो डाळींचे वाटप केले जात आहे.
५५ रुपये किलोने या डाळींची विक्री होत आहे. निगडी येथील ‘ अ ‘ व ‘ ज ‘ या दोन्ही कार्यालयांतर्गत डाळींचे वाटप सुरू झाले आहे. सध्या ‘ अ ‘ कार्यालयाकडे २७ हजार ४०० किलो तूरडाळ तर १४ हजार ९०० किलो चनाडाळीचा कोटा आला आहे. ‘ ज ‘ विभागासाठी २६ हजार ६०० किलो तुरडाळ तर १४ हजार ४०० किलो चनाडाळींचा कोटा आला असल्याची माहिती परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांनी दिली.











