न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील वाहनसंख्येची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. सीएसआर फंड आणि महासंचालक कार्यालयातून एकूण २४ आलिशान मोटारी मिळाल्यानंतर आता आयुक्तालयासाठी ९५ दुचाकी देखील मंजूर करण्यात आल्या आहेत. या दुचाकी लवकरच आयुक्तालयात दाखल होणार असल्याचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.
वरिष्ठ अधिका-यांच्या वाहनांची समस्या सुटल्यानंतर आयुक्तांनी मार्शल कर्मचा-यांच्या दुचाकीसाठी पाठपुरावा सुरु केला. महासंचालकांनी पिंपरी-चिंचवडची गरज लक्षात घेत एकूण ९५ दुचाकी मंजूर केल्या. यापैकी २० महासंचालक कार्यालयाकडून आणि ७५ पुणे पोलिस आयुक्तालयाकडून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.











