न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मुलन विभागाने पिंपळे सौदागर परिसरातील अतिक्रमणावर (बुधवारी) कारवाई केली.
यामध्ये स्त्यावरील हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. “ह” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपळे सौदागर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. येथील काटेपुरम चौक, मयूरनगरी, कृष्णाचौक, फेसम चौक, रामकृष्ण चौक या परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.
यात सात हातगाड्या, चार लोखंडी काऊंटर, एक लाकडी काऊंटर, आठ लोखंडी जाळ्या, १७ स्टॅन्ड बोर्ड, एक लोखंडी जाहिरात बोर्ड, एक दुचाकी, दोन छत्री स्टैंड, लाकडी लोखंडी बाकडे जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.











