- शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या महापालिका प्रशासन कशी सोडवणार?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24 जानेवारी 2025) :- पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येत असतो. अनेकदा रस्त्यावरून जाताना अनेक भटकी कुत्रे वाहन चालकांच्या मागे लागतात. त्यांच्यावर भुंकतात. प्रसंगी त्यांना चावा घेण्याच्या घटनाही बहुतांशी घडलेल्या आहेत.
नेहमीची ओरड होऊ लागताच महापालिका प्रशासन केवळ कारवाई केल्याचा देखावा करते. प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य अशी स्थिती म्हणावी लागेल.
या भटक्या कुत्र्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची देखील पाठ सोडलेली नाही. महापालिकेत प्रवेश करताच भटकी कुत्री इकडे तिकडे फिरताना दिसतात. महापालिकेचे पार्किंग स्थळ या भटक्या कुत्र्यांचा आवडता अड्डा बनला आहे. यात येथील कर्मचाऱ्यांचाही काहीसा दोष आहे. येथील भटक्या कुत्र्यांना दयाभावना दाखवत त्यांना बिस्किट आणि इतर खाद्यपदार्थ टाकले जातात. त्यामुळे ते सोकावले आहेत. या भटक्या कुत्र्यांना वेळीच आवर घालणे आवश्यक असताना पालिका प्रशासन केवळ बघ्याची भुमिका घेत आहे.











