- मा. नगरसेवक अॅड. विनायक गायकवाड आणि जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजारोहण….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२५) :- वाकड येथील वेणूनगर परिसरात भारताचा प्रजासत्ताक दिन आणि संविधान वाचनाचा कार्यक्रम वय वर्ष ७५ पूर्ण झालेल्या सर्व ज्येष्ठ सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. नगरसेवक अॅड. विनायक गायकवाड आणि एकशे एक वर्षीय जेष्ठ नागरिक नामदेव महादेव शेळके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण संपन्न झाले. श्री. दत्त वेणूनगर विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी संविधानचे वाचन केले. तसेच हौशी कलाकारांनी देशभक्तीपर गीते गायली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. नगरसेवक अॅड. विनायक गायकवाड यांच्या हस्ते २६ जानेवारीनिमित्त घेण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे मा. नगरसेवक अॅड. विनायक गायकवाड, दत्त वेणूनगर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष मधुकर रहाटे, के. पी. सिंग, बी. आर. पाटील, आप्पासाहेब तेली, लक्ष्मण घोरपडे, सतीश बोरसे, चंद्रकांत जाधव, सुरगोंडा पाटील, सुभाष कुलकर्णी, सतीश काळे, रघुनाथ बावनेर, .के. सी. कपूर, इंदुमती सोनवणे, राजपाल बागी, लक्ष्मण सातकर, सोन्याबापू गरजे, सुधीर अलकरी, विनोद नेरुरकर, भास्कर नारखेडे, भालचंद्र भोसेकर आदी उपस्थित होते.

















