न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २७ जानेवारी २०२५) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेताळनगर- चिंचवड शाखेमध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, शाखाप्रमुख मजीद शेख, शाखाप्रमुख रफिक बेग, उपविभाग प्रमुख कुदरत खान, उपशाखाप्रमुख किशोर सातपुते, मुस्तफा शेख, रमेश शेंडगे, महेश शेत संधी, कार्यकर्ते संतोष शिंदे, बाळासाहेब आगळे, सुनील बोराडे, अनिल बोराडे, विशाल आरसूळ, राकेश कोळी, राजू मासाळकर तसेच शिक्षिका रुपाली तेलंगी, माया कुलथे, कलावती नाटेकर, यास्मिन पठाण, सुनंदा पवार, मस्के, पिया आदी उपस्थित होते.











