न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली केंद्रीय विद्यालवाच्या धरतीवर ३ हजार २४३ बेंच खरेदी करण्यात येत आहेत. शिक्षण विभागाच्या मागणी प्रस्तावावर भांडार विभागाने मागविलेल्या दरपत्रकास नऊ संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. निविदा दर आणि योग्य स्पेसिफिकेशन सादर करणाऱ्या पात्र संस्थेकडून बेंच खरेदी केले जाणार आहेत. मनपाच्या नवीन शाळेत आणि काही इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी लवकरच नवीन बेंच उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
महापालिकेच्या शाळेतील विद्याध्योची गुणवत्ता वाढविणे तसेच शाळेत नाविन्यपूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजवकुमार धोरात, विविध शाळांचे ३५ मुख्याध्यापक तसेच सर्व पर्यवेक्षक यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली केंद्रीय विद्यालयाला भेट दिलो होती. तेथील शाळेच्या घरतीवर महापालिकेच्या शाळेत विद्यास्यन्ति बसण्यासाठी नाविण्यपूर्ण ३ हजार २४३ बेंच खरेदी करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला, त्यामध्ये ११२२ मोठे बेच आणि २१२९ छोटे पेंच खरेदी करण्याची मागणी भांडार विभागाकडे केली.
भांडार विभागाने निविदा प्रसिद करून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणा या संस्थांकडून दरपत्रक मागविले. त्यामध्ये पाच संस्थांनी सहभाग घेतला. नियमानुसार त्यातील तीन संस्था पात्र ठरल्या तर दोन संस्था अपात्र ठरल्या. पात्र संस्थेमधील एकाने नमुना सादर केला नाही म्हणून त्यांना बाद ठरवले. ठरलेल्या दोन संस्थांची निकोप स्पर्धा होत नसल्यामुळे निविदा रद्दचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा नव्याने फेरनिविदा काढून बेंच खरेदीसाठी नव्याने दरपत्रक मागविण्यात आले. यावेळी नऊ संस्थांनी सहभाग घेऊन दरपत्रक सादर केले आहे. निविदा अटी शर्तीनुसार बेंच खरेदीसाठी पात्र ठरणाऱ्या कंत्राटदाराला खरेदीचे आदेश देण्यात येणार आहेत.
पहिली ते चौधीच्या विद्याभ्यांसाठी छोटे २ हजार १२१ आणि इयत्ता पाचची ते आठवीच्या विद्याभ्यांसाठी १ हजार १२२ असे एकूण ३ हजार २४३ बेंच खरेदी केले जाणार आहेत, निविदा दरानुसार एक पेंच (मोठा) ८ हजार ४३१ एवढ्या किंमतीत खरेदी केला जात आहे. तर, छोटा एक बेंच ८ हजार १४५ एवढ्या किंमतीत खरेदी केला जात आहे. मोठे आणि छोटे असे एकूण ३ हजार २४३ बैंच खरेदी केले जाणार आहे.
समाविष्ट गावांमध्ये महापालिकेच्या नवीन शाळा बांधण्यात येत आहेत. त्याचबरोबर पालकांचा पाल्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याकडे असलेला कल ओळखून महापालिका शहरात नवीन इंग्रजी शाळा सुध्दा सुरु करत आहे. या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी दिल्ली केंद्रीय विद्यालयाच्या धरतीवर नवीन बेंच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बेंच मजबूत असून दिर्घकाळ टिकणारे असून शैक्षणिक दृष्ट्या योग्य असल्याचा दावा शिक्षण विभागातील अधिका-यांनी केला आहे. मोठ्या आणि छोट्या आकाराचे एकूण ३ हजार २४३ बेंच खरेदी करण्यासाठी तब्बल २ कोटी ६७ लाख ३५ हजार १२७ खर्च केले जात आहेत.
दिल्ली केंद्रीयविद्यालयातील बेंच प्रमाणे मनपा शाळेत बेंच खरेदी करण्याची आमची मागणी आहे. तसा प्रस्ताव मध्यवर्ती भांडार विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे. नवीन ठिकाणी सुरु करण्यात येणाऱ्या मनपाच्या शाळांसाठी बेंच उपलब्ध करण्याची आवश्यकता आहेत. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दृश्था फायदेशीर असल्याने त्याची निवह करण्यात आली आहे.
– विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त…


















