न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२५) :- भक्ती शक्ती ते रावेत असा बीआरटीएस मार्ग विकसित केलेला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. शिवाय ही वाहने अत्यंत वेगाने जा-ये करत असतात. याच भागात अप्पूघर ला भेट देण्यासाठी नागरिक व कुटुंबीय मोठ्या संख्येने येत असतात. नागरिकांना भक्ती शक्ती ते रावेत हा बीआरटीएस रस्ता ओलांडावा लागतो.
तथापि रस्त्यावरील वेगवान वाहनांमुळे या भागात रस्त्यावर अनेक अपघात घडलेले आहेत. भविष्यात एखादा जीवघेणा अपघात होऊ नये, यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या बीआरटीएस रोडवर आयआरसी मानांकननुसार स्पीड टेबल किंवा गतिरोधक बसावेत. जेणेकरून वाहनांचा वेग आपोआप कमी होऊन नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल, अशी जागृत नागरिक महासंघाची मागणी आहे.
बीआरटीएस विभाग प्रमुख प्रमोद ओंबासे यांच्याशी जागृत नागरिक महासंघाने सविस्तर चर्चा केली. तीन दिवसात स्पीड टेबल बसवण्यात येईल, असे आश्वासन दिले. हे निवेदन अधिकारी सीनकर यांनी स्वीकारले. यावेळी जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव, सचिव उमेश सनस, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, पिंपरी चिंचवड शहर उपप्रमुख मच्छिंद्र कदम, सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, सांगवी विभाग सदस्य राजेंद्र कदम, तसेच सदस्य राजीव डोगीवाल आणि सदस्य सतीश घावटे उपस्थित होते

















