न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 31 जानेवारी 2025) :- उपचारासाठी डॉक्टरकडे गेलेल्या सेवानिवृत्ताची आरोपी डॉक्टरबरोबर ओळख झाली. त्यातून डॉक्टरने रुग्णालयात पार्टनरशिप देण्याचे त्यांना आमिष दाखवले. तसेच चांगला परतावा आणि 50% पार्टनरशिप देण्याचे कबूल केले. त्यासाठी सेवानिवृत्त दाम्पत्याकडून जवळपास दीड कोटी रुपये वेळोवेळी गुंतवणूक करण्याच्या आमिषाने आरोपी डाॅक्टरने घेतले.
दरम्यान त्यानंतर आरोपीने या सेवानिवृत्त दांपत्याला कोणतीही माहिती न देता सदर रुग्णालय अचानक बंद केले. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. या सेवानिवृत्त दांपत्याची या डॉक्टरने आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. जून 2021 ते डिसेंबर 2024 या दरम्यान डांगे चौकातील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी 68 वर्षीय सेवानिवृत्त इसमाने डॉ. अभिनव खरे याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून या डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या घटनेचा पुढील तपास सपोनि पवार हे करीत आहेत.











