न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 31 जानेवारी 2025) :- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सुजाता हरेश नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार तिवारी यांनी ही नियुक्ती केली. संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अनिता वर्मा यांच्या हस्ते नखाते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कांचन मोटघरे उपस्थित होत्या.
सुजाता नखाते या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर संघटिका म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्या कार्यरत असून त्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून महिलांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.











