न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरगाव (दि. ०४ फेब्रुवारी २०२५) :- ‘तू उद्या टपरी उघडलीस तर, तुझा मर्डर करतो. पोलिसात तक्रार केल्यास तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत तरुणाच्या खिशातील चौदाशे रुपये लंपास केले. तसेच दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या मामास हाताने व दगडाने मारहाण केली.
दोघेजन पान टपरीवर आले व त्यांनी सिगरेटची मागणी केली. टपरी चालकाने त्यांना सिगरेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोघांनी टपरीवरील काचेच्या बरण्या फेकून दिल्या.
ही घटना रविवारी उर्से येथील ओम साईराम पान टपरी येथे घडली. पानटपरी चालक आदित्य याने महेश गायकवाडसह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात फिर्याद नोंदवली असुन शिरगाव पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.