न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२५) :- महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या मानधनावरील ७२ सफाई सेवक व ०१ निवासी रखवालदार यांच्या हंगामी स्वरुपातील नियुक्तीला जून २०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सफाई कर्मचा-यांच्या नियुक्ती संदर्भात कामगार कल्याण विभागाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अभिप्राय मागितला होता. त्यानुसार कामगार कल्याण अधिकारी, कामगार कल्याण विभाग यांनी पत्राद्वारे वाढीव भत्ता देवून मुदतवाढ देण्यास हरकत नसल्याबाबतचा अभिप्राय पालिकेला सादर केला आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला होता. त्यास मंजुरी मिळाली असून आयुक्तांनी दि. २८/०६/२०२५ अखेर तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्तीस (दि.०६) रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार त्यांच्या वेतनासाठी ६०,३२, १३६/- (साठ लाख ३२ हजार एकशे छत्तीस रूपये) एवढ्या खर्चास मंजुरी मिळाली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या सन २०२४-२५ व्या अंदाजपत्रकामधील “शाळावार सफाई सेवक कर्मचारी” या लेखाशीर्षामध्ये तीन कोटी साठ लाख रूपये मंजूर केलेले असून या लेखाशीर्षामधून वेतन अदा केले जाणार आहे. जानेवारी २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीतील किमान वेतन दर अद्याप प्राप्त झालेला नसल्याने सदरचे वेतन हे जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील किमान वेतन दरानुसार असून वेतनातील फरकाची रक्कम नंतर अदा करण्यात येणार आहे.
















