- शहरातील २५ ठिकाणी पोलिसांनी केलीय नाकाबंदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२५) :- धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडमध्ये दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळवडीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिस रस्त्यावर उतरणार आहेत.
नागरिकांनी रस्त्यावर हुल्लडबाजी, बेदरकारपणे वाहने चालवू नयेत असे आवाहन गुन्हे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केलं आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’साठीदेखील पथके नेमण्यात आली आहेत. एकूण २५ ठिकाणी मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात दिवसभर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान मद्य प्राशन करुन वाहन चालविताना आढळल्यास वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून खटले न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत.
















