न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२५) :- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशभरात अनेक अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. आमच्या भगिनीं या अत्याचारांना बळी पडत आहे. अनेकदा कँडल मार्च काढले जातात, मोर्चे काढले जातात पण यावर कोणती ठोस भूमिका आजपर्यंत घेण्यात आली नाही आणि म्हणूनच यावेळी होळी साजरी करताना यावेळी होळीमध्ये अत्याचारांचं दहन व्हावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या अत्याचारांच्या प्रतिमा होळीमध्ये दहन करण्याचा निर्णय घेतला, असे ‘आप’चे रविराज काळे म्हणाले. तसेच अशा घटना होऊ नये आमच्या भगिनी अशा घटनांसाठी बळी पडू नये यासाठी प्रार्थना केली.
त्यावेळी रविराज काळे म्हणाले, ‘अनेक वेळा अशा घटना आपल्या कानी येतात काही दिवसाची बातमी होते. तोपर्यंत विषय ताजा राहतो, पण काही दिवसानंतर बातमी संपते आणि हा विषय मागे पडला जातो. पुढे काय झालं त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली का? त्या ताईला न्याय मिळाला का? याकडे कोणी बघत नाही आणि खऱ्या अर्थाने ते बघणे गरजेचे आहे.
तसेच यापुढे अशा घटना झाल्या तर आम्ही पूर्ण ताकतीने रस्त्यावर उतरू. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राझ्यांच्या पाटलाचा चौरंगा केला त्याच प्रमाणे चौरंगा करण्यासारखे कायदे करण्यासाठी लढा देऊ. महाराष्ट्रावरील सर्व संकटे या होळीत दहण होवो, अशी प्रार्थना केली.
















