न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०४ फेब्रुवारी २०२५) :- तरुणास फोन करून बोलावून घेतले. ‘आधीची गर्लफ्रेंड हिच्याशी बोलू नकोस, माझ तिच्याशी लग्न होणार आहे’ असे कारण देत दोन तरुणांनी तरुणास बेदम मारहाण केली.
हा प्रकार रविवारी चिंचवडगाव येथील एका सराफ दुकानाच्या बाजूला घडला. याप्रकरणी 24 वर्षीय सौरभने आरोपी आशिष गवारे व त्याचा अनोळखी मित्र या दोघांवर फिर्यादी नोंदवण्यात आली आहे.
चिंचवड पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.