पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ‘जेई’ लसीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२५) :- जापनीज मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार असून तो प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. हा आजार मेंदूच्या मज्जातंतूंवर गंभीर परिणाम करू शकतो. देशातील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते. या आजारातून ३०-४० टक्के बरे झालेल्या रुग्णांमध्ये आजीवन मज्जासंस्थेशी संबंधित अपंगत्व दिसून येते. त्यामुळे या जीवघेण्या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा व मुलांना जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लस द्यावी, असे आवाहन चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप काटे यांनी केले.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने बुधवारी (दि. १२) रोजी जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना (Japanese Encephalitis – JE) ही लस देण्यात आली.
शाळेच्या प्राचार्य सुविधा महाले यांनी विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम शाळेत नेहमीच राबविलेले जातात. जापनीज मेंदूज्वर या आजाराची लक्षणे सांगितली. तसेच उपस्थित पालकांमध्ये आजाराबाबत जनजागृती केली.