- तर, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ‘पोलिसांना उचलायला सांगेनचा’ दम चर्चेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२५) :- पुणे जिल्हा हा टेक्नॉलॉजीच कॅपिटल आहे. या जिल्ह्यात अनेक गुंतवणूक येत आहेत. या गुंतवणुकीला जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण तयार करायला हवं. हे पोषक वातावरण पोलीस अधिकारी तयार करतील अशी अपेक्षा आहे. उद्योजकांना कुठलाही त्रास होऊ नये. कुठलाही नेता असू द्या त्याला क्षमा (गय) केली जाणार नाही. असा इशारा देखील दिला आहे. अनेक उद्योजकांच्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रारी आल्या होत्या, त्यांना त्रास होत असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा जाधववाडी चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार संतापले. त्यांनी माइकचा ताबा घेतला. हा कार्यक्रम पोलिसांचा आहे. काय चालले आहे. शिट्ट्या कशाला वाजवता, शिट्ट्या वाजऊ नका, मुख्यमंत्री येथे आले आहेत. शिस्त आहे की नाही? आता शिट्ट्या वाजविल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्यानंतर शिट्ट्या बंद झाल्या.