न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- येत्या १५ ते २० दिवसांमध्ये पावसाळ्याचे आगमन होणार आहे. त्या काळात निर्माण होणा-या पूरजन्य परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. तसेच क्षेत्रीय अधिका-यांसह आपत्ती, अग्निशामक, मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या ३ नद्या वाहतात. त्या पात्रात पाणी वाढल्यास संभाव्य बाधित भाग निश्चित करण्यात आले आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात पवना नदीकाठावरील माता रमाबाई वसाहत, भाटनगर, बौध्दनगर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील पवना नदीकाठावरील मोरया गोसावी मंदिर परिसर, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील पिंपळे गुरव, पवना नदीकाठचा परिसर, ”ई” मध्ये क्षेत्रीय कार्यालयात बोपखेल गावठाणचा मुळा नदीकाठचा परिसर, ‘फ’ क्षेत्रीय व कार्यालयात संजय गांधीनगर, पिंपरी, रहाटणी नदीकाठचा परिसर आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील मुळानदी काठावरील सांगवीतील मधुबन सोसायटी, क्षेत्रीय संगमनगर, ममतानगर, दापोडीतील बौध्दविहार व स्मशानभूमी नदीकाठचा परिसर, पवनावस्तीचा समावेश आहे.
पूर नियंत्रण कक्षात ५ रबर बोट, ओबीएम, ७० लाईफ जॅकेट, २० लाईफ रिंग, १५ रोप्स, १० हुक्स, ४ पोर्टेबल डिझेल पंप, ९ पोर्टेबल पेट्रोल पंप, १० वुड कटर चैन साँ, १ सुधारीत तराफा ही बचाव उपकरणे उपलब्ध आहेत. तसेच ७ वॉटर टेंडर, १ वॉटर बाउंजर, १ मीनी वॉटर टेंडर, १ फ्लड रेस्क्यु वाहन, १ रेस्क्यु वाहन, १ टाटा मोबाईल, १ टाटा सुमो, ५४ मीटर एलएलपीचे १ वाहन उपलब्ध आहे.
पूर नियंत्रण कक्ष
विभाग संपर्क क्रमांक
मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष ०२० – ६७३३१५५६ / ३९३३१५५६
‘ अ क्षेत्रीय कार्यालय ०२० – २७६५६६२१ , ९९२२५०१४५३ / ४५४
‘ ब ‘ क्षेत्रीय कार्यालय ०२० – २७४५०१५३ , ९९२२५०१४५५ / ४५६
‘ क ’ क्षेत्रीय कार्यालय ०२० – २७१२२९६९ , ९९२२५०१४५७ / ४५८
‘ ड ‘ क्षेत्रीय कार्यालय ०२० – २७२७७८९८ , ९९२२५०१४५९ / ४६०
‘ ई ‘ क्षेत्रीय कार्यालय ०२० – २७२३०४१० / १२ , ८६०५७२२७७७
फ क्षेत्रीय कार्यालय ०२० – २७६५०३२४ , ८६०५४२२८८८
ग ‘ क्षेत्रीय कार्यालय ७८८७८६८५५५ , ७८८७८७९५५५
ह ‘ क्षेत्रीय कार्यालय ०२० – २७४२५०३ , ९१३००५१६६६
अग्निशामक दल ०२० – २७४२३३३३ , ९९२२५०१४७५
आपत्ती व्यवस्थापन ७२७६७७१०७७











