न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- सांगवीतील सिक्यूएई परिसरात बिबट्या आल्याची अफवा पसरल्याने नागरिकांत एकच धांदल उडाली. सर्वांच्या मोबाईलवर ”बिबट्या आला” हा एकच मेसेज फिरू लागला. मात्र, प्रत्यक्ष वन विभाग अधिका-यांनी पाहणी करून तो बिबट्या नसून रानबोका अथवा रानमांजर असल्याची माहिती दिली.
बिबट्याच्या चर्चेने सांगवी परिसरात भीती निर्माण झाली होती. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बाहेर फिरू नये असा सल्ला मिळू लागला होता. अधिका-यांनी पोलीसांना व वन विभागास पत्र लिहून बिबट्या दिसल्याची माहिती दिली.
मात्र हे पत्र सार्वजनिक झाल्यामुळे एकच धांदल उडाली. या विषयाची पाहणी करण्यासाठी वनरक्षक विजय शिंदे, वनपाल महेश मेरगेवाड, सिक्यूएई सुरक्षा अधिकारी डी पी साना, स्थानिक प्राणीमित्र विनायक बडदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा हा प्रकार समोर आला.











