न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडलेल्या पिंपरी चिंचवड स्कूल ऑलिम्पिया गेम्स-स्केटिंग २०२४-२५ मध्ये अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहूच्या स्केटर्सनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाच्या वतीने टेल्को ग्राउंड रोलर स्केटिंग रिंक, पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती.
या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमधील ३४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि त्यातील तब्बल २५ विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली. त्यात श्लोक थिटे, समर्थ सुळ, श्रेया गमे, वेदांत खंडागळे यांनी सुवर्णपदके तर अभिनव गमे, काव्या कातोले, तनय निखाडे, रिदान जमादार, रेहान मुजावर, अथर्व फटांगडे, अथर्व पसारगे, वरद पाटील यांनी रौप्यपदके तसेच गुर्वेद चव्हाण, कार्तिक कुलकर्णी, आयुष नारखेडे, अंश कलांगे, अनन्या प्रसाद, आर्यन पाटील, प्रथमेश बेलंकी, ईशा क्षीरसागर, अद्वैत झेंडे, सार्थक चंदनशिवे, वेदांत हाल्लोळे, जय लाटे या विद्यार्थ्यांनी कांस्यपदके पटकावली.
याशिवाय, हर्ष भगत, श्रेयश काळोखे, अथांग चव्हाण, अर्णव जगताप, समृद्ध भोसले, आयुष हेगडकर, विराज काळे, पार्थ हणमंते, अमेय मदणे आणि समर्थ गाढवे या विद्यार्थ्यांनीही आपल्या गटांमध्ये उत्कृष्ट खेळ केला. या सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षक अश्रफ शेख यांचे सृजन फाउंडेशनचे सर्व सदस्य व शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी अभिनंदन केले.















