न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- महापालिकेच्या वतीने दापोडीतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) प्रवेशद्वारासमोर भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे.
भुयारी मार्गावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर हा मार्ग वाहतुकीस खुला केला जाणार आहे. भुयारी मार्गाचे काम नोव्हेंबर २०१७ ला सुरू करण्यात आले होते. या कामास १० महिन्यांची मुदत होती. मात्र, विविध कारणांमुळे त्यास विलंब झाला. हे काम संपण्यास तब्बल १८ महिने लागले आहेत.
भुयारी मार्गावरील डांबरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूने संरक्षक कठडे बांधले आहेत. तसेच, पथदिव्याचे खांब लावण्यात आले आहेत. सीएमईतील लष्कराचे अवजड वाहनांना ये-जा करता यावी, म्हणून भुयारी मार्गाची उंची वाढविली आहे.











