न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात विविध कारणाने खोदलेले रस्ते व पदपथ पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे रोजी पूर्वी योग्यरीत्या दुरुस्त करावेत. हे काम क्षेत्रीय कार्यालयाकडून केले जावे, असे निर्देश पालिकेचे शहर अभियंता राजन पाटील यांनी गुरुवारी (दि. १६) रोजी दिले आहेत.
आयुक्त दालनात (दि. ३ मे) रोजी आपत्ती व्यवस्थापनबाबत संबंधित अधिका-यांची बैठक झाली होती. त्यानंतर दुसरी आढावा बैठक मंगळवारी (दि. १४) रोजी झाली. त्या बैठकीत रस्ता खोदाईमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करणे. ६०० मिमी. व्यासावरील स्टॉर्म वॉटर पाइप लाइन व चैंबर्स यांची साफसफाई करणे. आरोग्य विभागास स्थापत्य विभागामार्फत आवश्यकतेप्रमाणे मशिनरी उपलब्ध करून देणे. रस्त्यावरील स्टॉर्म वॉटर चेंबर्सचा झाकण्याची पाहणी करून योग्य कार्यवाही करणे. पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय झाला होता.
त्या अनुषंगाने शहर अभियंता पाटील यांनी सर्व ८ क्षेत्रीय अधिकायांना निर्देश दिले आहेत. हे खोदलेले रस्ते व पदपथ दरुस्ती ३१ मे रोजीपूर्वी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.











