न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२५) :- सन १९८३ व १९८४ तील दहावी बॅचचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा शनिवारी तब्बल ४१ वर्षांनी नेहरूनगर येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमाला जवळपास ९० विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव होत्या.
माजी शिक्षकांपैकी सुलभा साळवी मॅडम, हरिश्चंद्र मचाले सर, नारायण थिटे सर, गोविंद चितोडकर सर, रामदास शिंगाडे सर, पार्वती भोसले मॅडम आणि टिपरे मॅडम या सर्व माजी शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन मार्गदर्शन केले.
काही विद्यार्थी उच्चपदावर तर काही उद्योजक बनले आहेत. काहींनी स्वतःच्या शिक्षण संस्था काढल्या आहेत. याचा आम्हा सर्व शिक्षकांना सार्थ अभिमान वाटतो आहे, असे कौतुक करीत गुरुजनांनी आशिर्वाद दिले.
यावेळी राम मेमाणे, सुभाष ढेरे, मनोज ढेरंगे व अभिनेते काळूराम ढोबळे यांनी जुनी मराठी व हिंदी गीते गाऊन आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे नियोजन नितीन समगीर, गोकुळ गायकवाड, संजय चव्हाण, रोहिदास गव्हाणे, संजय काळभोर, मुबारक पानसरे, दिलीप शिंदे, नंदा ढेरे, आशा साळवी यांनी केले. गोकुळ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका वैशाली शेलार व वर्षा हडपसरकर यांनी केले तर आभार नितीन सामगिर यांनी मानले.














