न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ मे २०२६) :- पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना किवळे परिसरात घडली आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश साठे हे राहत असलेल्या अपार्टमेंटच्या टेरेसवर उभे असताना आरोपी विक्रांत कुसळे याने त्यांना गाठले. “तू माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोस?” असा जाब विचारत आरोपीने फिर्यादीच्या डाव्या मांडीवर आणि पोटाजवळ चाकूने वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोउपनि राठोड करीत आहेत.














