न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ मे २०२६) :- पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील मैदानात झोपलेल्या तरुणाचा मोबाईल फोन आणि चांदीचे ब्रेसलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत सोनवणे हे मैदानात दारू पिण्यासाठी बसले होते. त्यानंतर त्यांना झोप लागली. सकाळी उठल्यानंतर त्यांचा मोबाईल फोन आणि हातातील चांदीचे ब्रेसलेट गायब असल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेतला असता वस्तू न मिळाल्याने चोरी झाल्याची खात्री पटली.
या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोफौ घोडके करीत आहेत.














