न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ मे २०२६) :- मोबाईल चार्जर देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून मेडिकल दुकानदाराला स्टीलच्या कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना संभाजीनगर येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय चौधरी हे त्यांच्या मेडिकल शॉपमध्ये असताना तीन आरोपी तेथे आले. आरोपींनी मोबाईल चार्जर मागितला. मात्र चार्जर देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापले.
त्यापैकी एका आरोपीने हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादीच्या नाकावर, चेहऱ्यावर आणि डोक्याच्या मागील भागावर वार केले. तर इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी बबलू म्हस्के, आदिनाथ गायकवाड आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नोटीसवर सोडण्यात आले आहे. पुढील तपास पोहवा चौधरी करीत आहेत.














