न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ मे २०२६) :- अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवलाख उंब्रे परिसरात कारवाई करत एका तरुणाला गांजासह अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे २७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस कैलास पडवळ (वय २५) हा मोकळ्या जागेत गांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला असता आरोपीकडून ३५८ ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आणखी एक आरोपी राहुल मचले हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास सपोफौ चौधरी करीत आहेत.














