न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२५) :- तिघा जणांनी दोन रिक्षा आणि पाच ते सहा दुचाकींचे नुकसान करीत कोयत्याच्या सहाय्याने रिक्षांच्या काचा फोडलेल्या आहेत. कोयता हवेत उगारून परिसरात दहशत निर्माण केली आहे.
ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास दापोडी येथील पवार वस्तीतील फैजल उलूम मदरसा परिसरात घडलेली आहे. याप्रकरणी फिरोज इरशाद शेख (वय ५७, रिक्षा चालक, रा. दापोडी) यांनी आरोपी नुमान अख्तर खान, सिपटेन कयूम खान, मुजफ्फर सलीम कुरेशी (सर्व राहणार दापोडी) यांच्या विरोधात दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवलेली आहे.
पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून, पुढील घटनेचा तपास पोलीस हवालदार तिटकारे हे करीत आहेत.
















