- एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२५) :- राज्यातील अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती राज्य शासनाने वकिलामार्फत दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित असून एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे रविवारी दिली.
भारतीय जनता पक्षाचे सक्रिया सदस्य आणि सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांनाच यापुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळेल. कोण कोणाच्या जवळचा असला तरी, सदस्य नसल्यास संधी तिकिट मागण्याचीही संधी मिळणार नाही, अशी तंबी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी भाजप कार्यकर्त्यांना दिली.
बावनकुळे म्हणाले की, भाजपने १ कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी १ कोटी १६ लाख प्राथमिक नोंदणी पूर्ण झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशाच्या जोरावर हे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहेत. हे उद्दीष्ट फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत साध्य करायचे असून त्यासाठी येत्या १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. प्राथमिक सदस्य नोंदणी ही नेत्यांसाठी नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार असलेल्या कार्यकर्त्यांसाठी आहे.
मतदान करणाऱ्या प्रत्येकाला पक्षाशी जोडून घेणे आणि त्याला भाजपचा सक्रिया सदस्य करून घेणे आवश्यक आहे. पक्षाच्या सक्रिय सदस्याला आणि सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांना यापुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळणार आहे. सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महापारै, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष महायुतीचे निवडून येतील.
















