न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :- ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी शाळेच्या वतीने रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ॲड.धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव श्री. संतोष शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. मयुर जगताप यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर श्री.धम्मराज साळवे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मार्गदर्शन केले आणि त्यांचे आदर्श कसे अनुसरावेत याबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच श्री. संतोष शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा घेण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. शाळेच्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण शाळेमध्ये राष्ट्राभिमान आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.














