न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२५) :- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, श्रीक्षेत्र देहू आयोजित पूर्व प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. प्रत्येक वर्षी स्नेहसंमेलनाची एका सामाजिक विषयावरील संकल्पनेवर आधारित गीतांची व नाट्यछटेची रचना असते. यावर्षी विद्यार्थ्यांना नदीचे जीवन समजून यावे, जलप्रदूषणाची समस्या एक संकट म्हणून आपल्यापुढे उभी आहे हे त्यांच्या लक्षात यावे, माणसाच्या आयुष्यामध्ये पाणी हेच जीवन आहे… आपल्या जीवनाशी व एकूणच या सर्व सृष्टीच्या जीवनाशी पाण्याचा किती महत्त्वपूर्ण वाटा आहे… या सर्व गोष्टींची अतिशय संवेदनशीलतेने जाणीव त्यांना व्हावी यासाठी गेल्या वर्षभरात देखील नदी या विषयाशी संबंधित सर्व उपक्रम राबविण्यात आले.
या वर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन
‘River : Life life line of India’ याच विषयाच्या अनुषंगाने संपन्न झाले. पालक बंधू-भगिनींच्या मनात देखील या विषयामुळे जागृती झाली व पालक बंधू-भगिनींनी देखील अशा पर्यावरणपूरक विषयांनी स्नेहसंमेलन संपन्न होते याचे विशेष कौतुक केले.
तीन ते सहा वयाच्या या लहान विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम, उपप्राचार्या सौ. शैलजा स्वामी मॅडम, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सुब्बलक्ष्मी पाठक मॅडम यांच्या मार्गदर्शनाने शिक्षकांनी या सर्व आयोजनासाठी विशेष कष्ट घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, लेखक, विचारवंत श्री. दत्तात्रय अत्रे, उद्योजक श्री.शंकरराव मांढरे, उद्योजक श्री. गणेश बोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी वर्षभर शाळेत चालणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेत पालकांसमोर वार्षिक अहवाल सादर केला. सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इ. चौथीतील कु. काव्या काळोखे व कुमार ऐश्वर्य पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इ. चौथीतील कुमारी ईश्वरी समरीत हिने आभारप्रदर्शन केले.












3 Comments
📍 + 0.75617859 BTC.NEXT - https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=cd2c27adb45500eec6d1224aa488086a& 📍
c0dwh2
📐 You have a email № 479697. Read >> https://graph.org/GET-BITCOIN-02-25?hs=8d1ec609be42b8d67616ee3abca59954& 📐
f09tu4
Ammie Carco
I know this if off topic but I’m looking into starting my own blog and was curious what all is needed to get set up? I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny? I’m not very internet smart so I’m not 100 positive. Any recommendations or advice would be greatly appreciated. Cheers