न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२५) :- जून २०२४ रोजी नगरसचिव सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यापासून नगरसचिव हे पद रिक्तच आहे. सध्या अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे त्या पदाचा पदभार आहे.
काही दिवसानंतर तेही सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी हे पद न भरल्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती व विषय समितीच्या सभेचे कामकाज कसे चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान महापालिका सेवा नियमावलीत बदल करून नगरसचिव पदासाठी वृत्तपत्रात जाहिरात देऊन ते पद थेट भरण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.











