- खोट्या माहितीच्या आधारे मुलाचा जन्म दाखलाही मिळवला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. ०१ मार्च २०२५) :- एका गर्भवती महिलेने काही पैशांच्या मोबदल्यात स्वतःच्या मुलाची देहूरोड येथील दाम्पत्याला विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलेला प्रसूतीसाठी तिची खरी ओळख लपवुन कॅन्टोमेंट बोर्डाच्या रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान महिलेच्या नवजात बालकाची खोटी माहिती जन्म नोंदणीच्या घोषणापत्रामध्ये देवुन त्यावर आरोपीने स्वत:चे नाव न टाकता ‘मोहित’ असे नाव टाकले. बालकाच्या दत्तक प्रकियेबाबत शासकिय नोंद न करता शासनाची दिशाभूल केली. बालकाची खोटी माहिती देवुन त्याचा जन्माचा दाखला प्राप्त केला. रुग्णालय प्रशासनाची फसवणुक केली.
याप्रकरणी एका महिलेने मरविन डेविड वाझ, महिला आरोपी, महिला आरोपी, बालकाला जन्म देणारी अनोळखी स्त्री या चौघांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. देहूरोड पोलिसांनी सह बाल न्याय अधिनियम २०१५, कलम ८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून श्रेणी पोउपनि वाव्हळे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















