न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२५) :- डूडूळगावातील फॉरेस्टच्या डोंगराजवळ ३४ वर्षीय आमुसाब मुल्ला याचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राच्या सहाय्याने पोटावर वार करून त्याचा खून केला आहे.
हा प्रकार (दि. २८ फेब्रुवारी रोजी स. ०८/०० वा. दरम्यान उघडकीस आला. याप्रकरणी मयत तरुणाचे वडील साहेबलाल मुल्ला (वय ५६ वर्षे) यांनी अज्ञाताच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
त्यानुसार दिघी पोलिसांनी गुन्हादाख्ल केला आहे. घटनेचा पुढील तपास वपोनि ढेरे हे करीत आहेत.












