न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- “मी दापोडीतील डॉन आहे, आणि तु डॉनशी पंगा घेणार, थांब तुझा गेम खल्लासच करतो” अशी धमकी देत धारदार हत्याराने पाठीत व गळ्यावर वार करुन तरुणाला गंभीर जखमी केले आहे.
जखमी तरून मित्रांसोबत घरी जात होता. त्यावेळी जुन्या पैशाच्या वादातुन (दि.०८) रात्री साडेआठ वा. दरम्यान वेलकम सलुन दुकान, रेल्वे फाटका शेजारी, दापोडी येथे हा प्रकार घडला.
१७ वर्षीय कृष्णा संतोष शिंगोटे (रा. दापोडी) याने आरोपी श्रेयश जवळेकर (रा. दापोडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून दापोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड केले आहे. वपोनि वाघमारे पुढील तपास करीत आहेत.













