न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. सर्व पोलीस ठाण्याच्या ‘डे ऑफिसर’ म्हणून महिला पोलीस निरीक्षक, महिला सहा. पोलीस निरीक्षक, महिला पोलीस उप-निरीक्षक यांनी सहभाग घेतला.
सर्व पोलीस ठाण्याच्या ‘डे ऑफिसर’ म्हणून महिला पोलीस निरीक्षक, महिला सहा. पोलीस निरीक्षक, महिला पोलीस उप-निरीक्षक यांनी सहभाग घेतला. त्यांनी पोलीस ठाण्याचा कारभार पहिला.
जागतिक महिला दिनांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, कार्यालय येथील शिवनेरी हॉल येथे सर्व महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अमंलदार यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.













