न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२५) :- लॉजिंग हॉटेल येथे दहशत निर्माण करुन जोरजोरात आरडाओरडा व शिवीगाळ केली. शस्त्राचा धाक दाखवुन २०,००० रुपयांची खंडणीची मागणी केली. मागणी पुर्ण नाही केल्यास तुझा व तुझा मालक याचा मर्डर करील, अशी धमकी दिली.
ही घटना रावेत येथील एका लॉजिंग हॉटेलमध्ये शुक्रवारी घडली. दिनेश मराठे (हॉटेल लॉजींग व्यवसाय) यांनी आरोपी १) हनुमंत भगवान शिंदे, आरोपी निष्पन्न प्रेम प्रेमनाथ ठाकुर यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. सपोनिराहुल कुभांर पुढील तपास करीत आहेत.