न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२५) :- तिघ व्यावसायिकांनी दुसऱ्या कंपनीचे स्वामीत्व असलेल्या कंपनीचे बनावट पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड विक्रीसाठी ठेवले. स्वतःचा आर्थिक फायदा केला. हा प्रकार (दि. १५) दरम्यान डिलक्स मॉल, डिलक्स चौक, पिंपरी येथील मोबाईल शॉपमध्ये घडला.
याप्रकरणी महेश कांबळे यांनी आरोपी १) कृष्णा अमराराम भाटी, २) मुकेशकुमार लालाराम, ३) राजेशकुमार ओबाराम चौधरी या तीन व्यावसायिकाच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
पिंपरी पोलिसांनी ११४/२०२५ कॉपी राईट अॅक्ट सन १९५६ चे कलम ५१, ६३, ६४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि कापरे पुढील तपास करीत आहेत.